Synopsis

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार राज्यशासन आणि राजकारण (State Government & Politics) हे बी. ए. द्वितीय वर्षः चतुर्थ सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यशासन आणि राजकारण (State Government & Politics) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये युनिट १ - केंद्र-राज्य संबंध आणि राज्यपाल (Centre-State Relations and Governor), युनिट २ - राज्य विधिमंडळ (State Legislature), युनिट ३ - मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालय (Chief Minister and High Court) आणि युनिट ४ - पंचायत राज आणि माहितीचा अधिकार (Panchayat Raj and Right to Informations) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Book Details

ISBN-13 : 9788193467817
Publisher : Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
Date of Addition: 2021-02-25T12:08:40Z
Language : mar
Categories : Nonfiction
Usage Restrictions: Copyright.